व्हॅलेंटाईन डे निमित्त युवकांचा गो-शाळेस चारा



व्हॅलेंटाईन डे निमित्त युवकांचा गो-शाळेस चारा

नगर ((दि.14) : फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे सर्वत्र साजरा केला जातो, अनेक युवक-युवती यात मोठ्याप्रमाणात सहभागी होत असतात. परंतु  महाविद्यालयीन युवकांना सौरभ शिंदे याने एकत्र घेऊन अभिनव उपक्रम राबविला. या युवकांनी अरुणोदय गो-शाळेत चारा वाटप केले. 

 याप्रसंगी   राजु वाळके, हेमंत घोंडगे, सिद्धांत चौधरी, अनिकेत विसरे, यश मुनोत, उदय पटवेकर, प्रेम खंडागळे, मयुर गरुड, मयुर व्यवहारे, ओंकार त्रिंबके, यश शिंदे, स्वप्नील शिंदे, गौरव घाटविसावे, दिपक सुंबे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी सौरभ शिंदे म्हणाले, युवकांनी विविध डे निमित्त अनावश्यक व आपल्या सांस्कृतिला बाधक असणारे उपक्रम न राबविता आपली संस्कृती जपली पाहिजे. याच हेतूने व्हॅलेंटाईन डे निमित्त गो-मातेस चारा देऊन युवकांपुढे आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. संस्कार आणि संस्कृती जपण्याचे काम युवकांच्या हाती असल्याने समाजहिताचे उपक्रम राबविले जावेत, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या उपक्रमात महाविद्यालयीन युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमांचे अनेकांनी कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post