पोलिसांना दमदाटी करुन आरोपी पुन्हा पसार

 

पोलिसांना दमदाटी करुन आरोपी पुन्हा पसार

नगर (दि.17) : फरार आरोपीने पोलिसांना दमदाटी करून पलायन केल्याची घटना सुपा टोलनाका येथे रविवारी रात्री साडेआठ वाजता घडली. विश्‍वजीत रमेश कासार (रा. वाळकी, ता. नगर) असे आरोपीचे नाव असून याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कासार याच्याविरूध्द अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिस त्याच्या मागावर होते. तो सुपा टोलनाका येथून जाणार असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. तो सुपा टोलनाका येथे आला असता, त्याची गाडी पोलिसांनी अडवली. पोना शेख यांनी त्यास खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर शेख त्यास पकडण्यासाठी गेले असता अरोपीने गाडीतून खाली न उतरता दमदाटी केली. तसेच पोलिसाच्या हातातोंडावर मारून पुण्याकडे पलायन केले.

याप्रकरणी कोतवालीचे पोकॉ प्रमोद लहारे यांनी फिर्याद दिली. सुपा पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि राजेंद्र भोसले करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post