18 फेब्रुवारीला शिवाजी महाराज स्मारकात शिवदवंडी


18 फेब्रुवारीला शिवाजी महाराज स्मारकात शिवदवंडी


नगर (दि.17) : शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी काम करणार्‍या स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्यावतीने गेल्या 11 वर्षांपासून ‘शिवराय मनामनात, शिवराय घराघरात’ हा उपक्रम राबविण्यात येतो. त्यासाठी एक दिवस आधीपासूनच म्हणजे 18 फेब्रुवारीला जनजागृतीपर शिवजयंतीचा शिवदवंडीचा उपक्रम आयोजित केला जातो.

यावर्षीही हा कार्यक्रम होत असल्याचे स्मायलिंगचे राज्य कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी सांगितले. 18 फेब्रुवारीला सकाळी साडेदहा वाजता निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांतीवीर चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मारकात कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील डॉ.मंदार बिडवे, मराठा सेवा संघाचे अहमदनगर महानगराध्यक्ष अभिजीत एकनाथ वाघ, हिंद सेवा मंडळाचे उपकर्याध्यक्ष डॉ पारस कोठारी, राहुल नंदकुमार झावरे यांचा 18 व्या शतकातील पोर्तुगीज चित्रकाराने काढलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन मान्यवरांचा सन्मान होणार आहे अशी माहिती अजित भोर यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post