नांदेड जिल्ह्यात प्रश्नपत्रिका फुटल्याची तक्रार
इंग्रजी पेपरला राज्यात 82 कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांवर कारवाई
नगरमध्ये आठ विद्यार्थ्यांचा समावेश
नगर (दि.19) : बारावीच्या पहिल्या इंग्रजी विषयाच्या पेपरला गैरप्रकार केल्याप्रकरणी राज्यातील तब्बल 82 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. नगर शहरासह जिल्ह्यातील आठ कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील मुखडे तालुक्यातील उमरदरी येथील परीक्षा केंद्रावरुन व्हॉटस्पवरुन प्रश्नपत्रिका फुटल्याची तक्रार आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर साधारण 45 मिनिटांनी हा प्रकार घडला. ज्या विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिकेचा फोटो काढला त्याचा प्रश्नपत्रिका क्रंमाकही असल्याचे या प्रकरणी संबंधित विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगीर यांनी सांगितले आहे.
बारावीच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी पेपरला नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक 34 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. पुणे विभागात 6, नागपूर 4, औरंगाबाद 7, कोल्हापूर 4, अमरावती 9, नाशिक 18 आणि लातूर विभागातील 34 कॉपी बहाद्दरांवर कारवाई करण्यात आली. नगर शहरासह जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या पथकाने आठ विद्यार्थ्यांवर कारवाई केली. संवेदशील परीक्षा केंद्रावर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. माध्यमिक शिक्षणाधिकारी दिलीप थोरे यांच्या पथकाने राहात्या 1, प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांम काठमोरे यांच्या पथकाने नगर तालुक्यातील टाकळी खातगाव येथे 1, नगर शहरातील दादासाहेब रुपवते विद्यालयात 2 कॉपी बहाद्दर सापडले. संगमनेर गटशिक्षणाधिकारी यांच्या पथकाने सह्याद्री कॉलेजमध्ये 1 तर पाथर्डी गटशिक्षणाधिकार्यांच्या पथकाने करंजी येथील विद्यालयात 3 विद्यार्थी कॉपपी करताना करताना आढळून आले.

Tags:
Maharashtra