खड्डे बुजवणार्‍या कामगारांचा सत्कार



खड्डे बुजवणार्‍या कामगारांचा सत्कार

नगर (दि.17) :  दिल्ली गेट ते पत्रकार चौक या रस्त्याचे पॅचिंग करून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे फिनिक्स सोशल फाउंडेशन व पीपल्स हेल्पलाइन संघटनेच्या वतीने खड्डे बुजविणार्‍या कामगारांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

शहरातील प्रमुख मार्गांवर खड्ड्यांची समस्या निर्माण झाली आहे. हे खड्डे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवन मरणाशी निगडित असलेल्या प्रश्‍नांची महापालिका व जिल्हा प्रशासनाने त्वरित दखल घेऊन ते प्रश्‍न तातडीने सोडविले पाहिजेत, अशी मागणी या वेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली. तसेच रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे महापालिका प्रशासनाचे आभार मानून खड्डे दुरुस्तीचे काम करणार्‍या कामगारांचा सत्कार करण्यात आला.

फिनिक्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, हिराबाई ग्यानप्पा, मीराबाई कनगर, आशाबाई भारस्कर, अंबिका जाधव, संगीता साळुंके, शारदा जंगम, वैशाली शिंदे, अशोक भोसले, नामदेव अडागळे, पोपट भोसले, अमजद बागवान, सुशीला देशमुख आदी या वेळी उपस्थित होते.  

Post a Comment

Previous Post Next Post