बेकायदेशिररित्या मावा विक्री करणार्यावर कारवाई
नगर (दि.17) : महाराष्ट्र शासनाचे बंदीचे आदेश असताना बेकायदेशीररित्या मावा विक्री करणार्या टपरीवर अन्न, सुरक्षा व औषध प्रशासन व कोतवाली पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करून 3 हजार 500 रूपयांचा सात किलो मावा जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि.15) माळीवाडा येथील चंदे बेकर्ससमोर, बंगाल चौकी येथे केली आहे. मावा विक्रेत्यावर कारवाई केल्याने शहरातील मावा विक्रेते यांचे धाबे चांगलेच दणानले आहेत.
या कारवाईत माळीवाडा भागातील एकाला ताब्यात घेऊन त्याच्या कडील 7 किलो वजनाचा साडेतीन हजार रूपयांचा मावा जप्त केला.
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी शरद मधुकर पवार यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी अन्न सुरक्षा व मा.न.दे. कायदा 2006 चे कलम 15 आय व्ही 27 (3) (डी) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक भंगाळे हे करीत आहेत.
Tags:
Maharashtra
