स्मिता अष्टेकर यांना पोलीसांनी घेतले ताब्यात



स्मिता अष्टेकर यांना पोलीसांनी घेतले ताब्यात


नगर (दि.18) : किर्तनकार इंदूरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणसाठी आज सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या नगरला येणार असल्याने त्यांना नगरमध्ये न येवून देण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी स्मिता अष्टेकर यांनी सोशल मिडीयावरुन त्यांना इशारा दिला होता. मात्र, आज अष्टेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

येथील प्रसिद्ध किर्तनकार इंदूरीकर महाराज यांच्या व्हिडीओ वरून निर्माण झालेल्या वादातून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यासाठी तृप्ती देसाई येणार आहे.

मात्र त्या पार्श्‍वभूमीवर नगर शहरासह अधीक्षक कार्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्या स्मिता अष्टेकर यांनी देसाई यांना आव्हान दिल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये यासाठी अष्टेकर यांना ताब्यात घेतल आहे.

देसाई यांना गाठण्यासाठी पुण्याच्या दिशेने निघालेल्या स्मिता अष्टेकर यांना भिंगार पोलिसांनी सुपा येथे ताब्यात घेतले आहे. तर, इंदूरीकर यांनी माफी मागून देखील देसाई निवेदन देण्यावर ठाम आहे. त्या थोड्याच वेळात नगरमध्ये दाखल होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post