शिवजयंती निमित्त वंचित घटकातील विद्यार्थ्यांना घडवली टँक म्युझियमची सहल
स्टुडंन्ट पॉवर फाउंडेशन व पूजा खिळदकर मित्र मंडळचा उपक्रम
विद्यार्थ्यांनी जाणून घेतली लष्करातील जवानांची शौर्य गाथा
नगर (दि.18) : स्टुडंन्ट पॉवर फाउंडेशन व पूजा खिळदकर मित्र मंडळच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त उत्कर्ष बालघरमधील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना नगर-सोलापूर रोड येथील लष्कराच्या टँक म्युझियमची सफर घडविण्यात आली. या सहलमध्ये विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या व लष्करातील जवानांच्या शौर्याची माहिती देऊन उच्च शिक्षण घेऊन लष्करमध्ये अधिकारी होण्याची प्रेरणा देण्यात आली.
टँक म्युझियमचे व्यवस्थापक विठ्ठल अटल यांनी बालकांचे स्वागत केले. यावेळी स्टुडंन्ट पॉवर फाउंडेशनचे अध्यक्ष मोहसीन सय्यद, पूजा खिळदकर, केअरिंग फ्रेंड्सचे संस्थापक अध्यक्ष युवराज गुंड, विश्वस्त सुमित गोहेर आदिंसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags:
Ahmednagar
