शिवाजीनगरला सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात


शिवाजीनगरला श्री बालाजी विठ्ठल रुख्माई मंदिर, 
शंभुराजे प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात

नगर (दि.18) : कल्याण रोड येथील शिवाजीनगरमधील शंभुराजे प्रतिष्ठान व श्री बालाजी विठ्ठलरुख्माई मंदिराचा उत्सव व धार्मिक सोहळ्यात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाचे चौथे वर्ष आहे. या विवाह सोहळ्यात वर-वधूंना संसारोपयोगी वस्तू, मंगळसूत्र, पोशाख अशा अनेक वस्तू देण्यात आल्या. विधीवत हा विवाह सोहळा पार पडला.

यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अमोल येवले, विजय पठारे, अनिल शिंदे, अभय आगरकर, शाम नळकांडे, सचिन शिंदे, गणेश कवडे, संपत बारस्कर, कुमार वाकळे, अजय चितळे, निखील वारे, भगवान फुलसौंदर, बाळासाहेब पवार, नगरसेविका पुष्पा बोरुडे, संजय चोपडा, अंजिक्य बोरकर, मनोज कोतकर, संपादक अशोक सोनवणे, काका शेळके, अनिल बोरुडे, संभाजी कदम, संजय शेंडगे आदी उपस्थित होते.

हा विवाह सोहळा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन सुरू झाला. तसेच या सोहळ्यामध्ये तीन वर-वधूंचे विवाहाचे आंतरपाट मान्यवरांच्या हस्ते धरुन लग्न करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांसह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सोहळा यशस्वी करण्यासाठी  राम नळकांडे, नंदू पिस्का, अंकुश साबळे, मार्कस् भांबळ, संजय शेळके, अमोल बनकर, भगवानराव काटेसर, उत्तमराव राजळे सर, आघाव गुरूजी, पारूनाथ ठोकळे, सुशांत शिंदे, सुरेश आधारे, अमोल बागल, प्रकाश कोटा, ऋषी सामल, रामा गुंडु, मिलिंद गुंजाळ, प्रवीण लोखंडे, सागर कोडम, गणेश कोडम, परवेज शेख, नवले मामा, अतुल भोसले, संतोष शियाळ, सुबोध कुलकर्णी, रवी बागडे, जालू तापकिरे, दादासाहेब भनगे, सतीश नळकांडे, सागर गुंजाळ, मच्छिंद्र चौकटे, गणेश लयचेट्टी, राजकुमार कटारिया, फारूक सय्यद, सुदाम परभणे तसेच शंभुराजे प्रतिष्ठान, शिवाजी नगरचा राजा मित्रमंडळ, नवग्रह प्रतिष्ठाण, नगरसेवक शाम नळकांडे मित्रमंडळ यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post