जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या खो-खो स्पर्धेत नेवासा संघाने बाजी मारली


जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या खो-खो स्पर्धेत नेवासा संघाने बाजी मारली

नगर (दि.16) : अहमदनगर जिल्हा परिषदेच्यावतीने कर्मचार्‍यांसाठी आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये खो-खो स्पर्धेत नेवाशाच्या महिला संघाने बाजी मारली असुन नेवाशाचा संघ विजेता ठरला तर नगर येथील संघ उपविजेता ठरला आहे.

जिल्हा परिषदेच्या या क्रीडा स्पर्धामधून कर्मचार्‍यांना एक संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती.  तसेच प्रत्येकाने खिलाडूवृत्तीने यात सहभागी होवून स्पर्धेचा आनंद घेतला. तीन दिवसाच्या या स्पर्धेत जिल्हयातील विविध संघांनी आपला उत्फुर्त प्रतिसाद नोंदवला आहे.

नेवासा येथील महिलाच्या संघाने विजेतेपद पटकावले असून उपविजेतेपद नगरने पटकावले आहे. या स्पर्धेमध्ये 14 संघ सहभागी झाले होते. यामधुन नेवासा संघानी बाजी मारली.  खो - खो स्पर्धेमध्ये विजयी संघात सुनिता भाऊसाहेब निकम, स्वाती विनायक नन्नवरे, मनिषा साहेबराव चाबुकस्वार, पल्लवी ज्ञानदेव कोल्हे, वैष्णवी रत्ना, मनिषा कैलास धानापुने, प्रमिला दत्तात्रय दाणे, सोनाली मच्छिंद्र भुसारी, अनिता सुरेश जाधव, वैशाली रामदास झावरे, शांता कोंडीराम मरकड यांनी सहभाग नोंदवला.

विजता व उपविजेता संघाचे अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, सभापती सुनिल गडाख, काशिनाथ दाते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जि.प.सदस्य शरद नवले, माधवराव लामखडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, परिक्षित यादव, डॉ.सुनिल तुंबारे, श्रीकांत अनारसे, संजय कदम, नितीन उबाळे, निखील ओसवाल, सुनिलकुमार राठी, क्रीडा अधिकारी कविता नावंदे आदीनी सहभागी झालेल्या स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post