बिबट्याच्या हल्यात शेळी ठार



बिबट्याच्या हल्यात शेळी ठार

देवळाली प्रवरा (दि.16) : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे बिबट्याचा वावर वाढत चालला आसून आता बिबट्याने रात्रीच्या वेळेस बिबट्याने शेळी ठार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे बिबट्याची दहशत पसरली असून शेतकर्‍यांमध्ये घबराटीचे वातावर आहे.


श्रीरामपुर रोडवर राहणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू अप्पासाहेब ढुस यांची वस्ती आहे. येथील दिवसस्थानी दि.16 रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याने शेळीवर हल्ला केला अशी माहिती त्यांनी दिली आहे. या दरम्यान, कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येत असल्याने अप्पासाहेब व त्यांचे बंधू अरुण हे उठून बाहेर आले बिबट्याने मृत अवस्थेत शेळीला सोडून पळ काढला असे त्यांचे म्हणणे आहे.

वारंवार वाढणारी बिबट्याची दशहतीचा बंदोबस्त करुन वन विभागाने या गोष्टीची तात्काळ दखल घेऊन ढुस वस्ती आणि येथील परिसरात पिंजरा लाऊन या बिबट्याचा बंदोबस्त करावा व रात्री अपरात्री शेतात जाणार्‍या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा अशी मागणी आप्पासाहेब ढुस यांच्यासह शेतकर्‍यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post