पहाटे फिरायला गेलेल्या महिलेचा अपघातात मृत्यु


सोलापुर बायपास अरणगाव येथे झाला अपघात : संतप्त ग्रामस्थांचा दोन तास रास्ता रोको 

अजुन किती बळी घेणार : संदेश कार्ले 


नगर - केडगाव (दि.17) : रविवारी पहाटेच्या वेळी फिरायला चाललेल्या महिलेला वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली . जोरदार धडक बसल्याने महिला जागीच गतप्राण झाली . अपघातास कारणीभूत ठरलेले अज्ञात वाहन निघून गेले . इंदूबाई सखाराम शिंदे ( वय ७२ )रा . अरणगाव ( ता. नगर )अपघातात गतप्राण झालेल्या महिलेचे नाव आहे . ही घटना अरणगाव येथील नाटमळा परिसरात सोलापूर बायपास रस्त्यावर रविवार दि .१६ पहाटे सहाच्या वेळेस घडली. या रस्त्यावर स्पीड बेकर उभारण्याची अनेक दिवासापासून मागणी असताना प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले .

          याबाबत समजलेली माहिती अशी की , अरणगाव ( ता. नगर ) येथील नाटमळा परिसरातील इंदूबाई शिंदे ही महिला पहाटे सहावा रस्ता ओलांडत असताना सोनेवाडीकडून वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली . धडक इतकी जोरदार होती की , जागीच त्यांच्या मृत्यु झाला .महिलेच्या शरीराचे तुकडे झाले . सोलापुर बायपास रस्ता अरणगावातून गेला आहे . यापूर्वी हा रस्ता अतिशय खराब झाल्याने अपघात घडत होते . त्यातच या रस्त्याची दुरुस्ती झाल्याने वाहने सुसाट वेगाने धावत आहेत . नाटमळा परिसरातील रस्ता अपघाती रस्ता असल्याने या ठिकाणी स्पीडब्रेकर बसविण्याची अरणगावातील ग्रामस्थांनी अनेक वेळा केली . मात्र बांधकाम विभागाने याची दखल घेतली नाही . त्यातच सुसाट वेगातील अज्ञात वाहनाने महिलेस जोराची धडक दिली . त्यातच महिलेचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले .नागरिक संतप्त झाल्याने पोलीस फोजफाटा मोठया प्रमाणात घटनास्थळी दाखल झाला . संतप्त नागरिक जागचे हलत नसल्याने मोठा पेच पोलीसा पुढे निर्माण झाला . मात्र जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी मधस्ती केल्याने ग्रामस्थांनीआंदोलन मागे घेतले .


अजुन किती बळी घेणार : संदेश कार्ले 

अरणगाव येथून सोलापूर बायपास रस्ता व नगर दौंड मार्ग नव्याने तयार झाले आहेत . त्यामुळे या मार्गावरून वाहने सुसाट वेगाने धावत आहेत . वेगात वाहने धावत असल्याने या ठिकाणी अनेकदा जीवघेणे अपघात घडले आहेत . अनेकांचा अपघातात बळी गेला आहे . या मार्गावर स्पीड बेकर उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी अनेकदा केली . मात्र बांधकाम विभागाने याचा कोणत्याही प्रकारे दखल घेतली . अजुन किती बळी घेतल्यानंतर स्पीडब्रेकर उभारणार असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी उपस्थित केला .

Post a Comment

Previous Post Next Post