फेसबुकवर गट्टी करुन महिलेला 21 लाखांना चुना लावणारा जेरबंद
सायबर पोलिसांनी आवळल्या दिल्लीत मुसक्या
नगर (दि.14) : महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून विश्वास संपादन करुन महिलेची 21 लाख 44 हजार 275 रुपयांची फसवणुक करणार्या एकाला नगरच्या सायबर पोलिसांनी जेरबंद केले. स्वराज मणिकुमार राय (वय 39, रा. 64 सी. 3 रा मजला, कृष्णानगर, गल्ली नं.2, सफदरजंग इक्लेव्ह, दक्षिण पश्चिम दिल्ली 110029 न्यु दिल्ली रा. 60 सी, तिसरा माळा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, या आरोपीस दि.17 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेली माहिती अशी की, फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून महिलेचा विश्वास संपादन करत मोबाईल क्रमांक मिळविला. मोबाईलवर चेंटिंग करुन त्यांच्या मुलांना लॅपटॉप व मोबाईल गिफ्ट पाठविले असे सांगून 50 हजार पाउंड स्कॅन झाले आहे, असे कस्टम ऑफिसर महिलेचा फोन आला अशी बतावनी केली. यानंतर वेगवेगळे बँक अकाऊंट नंबर पाठवून चार्ज भरा, नाहीतर गुन्हा दाखल होईल असे धमकावणी करुन 21 लाख 41 हजार 275 रुपयांची फसवणूक केली. याबाबत काही दिवसांपूर्वी सारबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करत सायबर पोलिसांनी दिल्ली गाठत अधिक चौकशी करता, आरोपीने वापरलेला आरसीआरसीआर बँक, नवी दिल्ली येथील अकांऊट हे बनावट कागदोपत्री रंजन राय यांच्या नावे उघडल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. चौकशीत आरोपी याने गुन्ह्याची कबुली दिली. दि.13 फेब्रुवारी रोजी त्यास अटक करण्यात आली असून, मुख्य न्यायदंडाधिकारी, नगर आरोपीला उभे केले असता दि.17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक सागर पाटील, शहर विभागाचे उपविभागीय अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस स्टेशनचे अरुण परदेशी यांच्या पथकातील पोसई प्रतिक कोळी, पोकॉ अभिजीत अरकल, पोकॉ राहुल, गुंडू, पोकॉ सम्राट गारकवाड, पोकॉ अमोल गारकवाड, पोकॉ भगवान कोंडार, पोहेकॉ रोगेश गोसावी, पोहेकॉ वासुदेव शेलार यांनी केली आहे.
जप्त साहित्य असे-
एक सॅमसंग कंपनीचा ग्रे रंगाचा मोबाईल, एक नोकिरा कंपनीचा काळे रंगाचा मोबाईल, एक अॅपल कंपनीचा आरफोन सिल्वर रंगाचा मोबाईल, एक आरसीआरसीआर बँकेचा इंटरनॅशनल डेबिट कार्ड, एक काळे रंगाची लहान बॅग आदी.
Tags:
Maharashtra
