नेट बँकिंगवरून एकाची फसवणूक

नगर (दि.04) प्रतिनिधी -
बँकेच्या अकौंटला कोणतीही ऑनलाईन नेट बँकिंगची सुविधा घेतलेली नसतानाही परस्पर अकौंट ऑनलाईन करून त्या खात्यात पैसे भरून वेगवेगळ्या अकौंटला ते पैसे ट्रान्सफर करण्याची घटना नुकतीच प्रॉव्हिडंड फंडाच्या एस.बी.आय. बँकेच्या अकौंटला घडली. ही घटना 1 जानेवारी 2018 ते 26 डिसेंबर 2019 या कालावधीत घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, बंडु रामभाऊ साळवे (वय 29, रा. साळवे नगर, बोल्हेगाव, नवनाथ मंदिराशेजारी, एमआयडीसी, हल्ली रा. गांधीनगर, बोल्हेगाव) यांचे प्रॉव्हिडंड फंडाचे एस.बीआय. अकौंट नंबर 34498662034 आयएफएससी कोड एस.बी.आय.एन. 0007389 याला कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन सुविधा नसताना सुध्दा कोणीतरी अज्ञात इसमाने विनापरवानगी स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता साळवे यांचे प्रॉव्हीडंड फंडांच्या अकौंट नंबरवरून अनाधिकृतपणे ऑनलाईन सुरू करून घेतले व त्याचा अ‍ॅक्सेस घेऊन त्यामध्ये प्रवेश करून त्यांच्या अकौंटमधील दि.1 जानेवारी 2018 ते 26 डिसेंबर 2019 दरम्यान इंटरनेटरवरून पैसे टाकुन ते पैसे वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर करून पैसे काढुन घेतले. या सर्व प्रकारात साळवे यांचे 13 हजार 900 रूपयांची फसवणुक झाल्याची तक्रार त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात केली आहे.
याप्रकरणी सायबर पोलिसांनी बंडु साळवे यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंड विधान कायदा कलम 419, 420, 467, 468 व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 43 (ए), 66 (डी) प्रमाणे फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास पोलिस निरीक्षक अरूण भागिरथ परदेशी हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post