नगर (दि.04) प्रतिनिधी -
भरधाव वेगातील कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिला जखमी झाल्याची घटना अप्पु हत्ती चौक ते दिल्लीगेट जाणार्या रोडवर खाकीदास बाबा मठाजवळ घडली. ही घटना सोमवारी (दि.30 डिसेंबर ) सकाळी 10.15 च्या सुमारास घडली.
याबाबतची माहिती अशी की, सौ. मंगल सचिन भोसले (वय 42, रा. महालक्ष्मी उद्यानाशेजारी) या त्यांची दुचाकी (क्र. एमएच 16 सी बी 5889) वरून जात असताना भरधाव वेगातील आलेल्या एका इंडिका कारने (एमएच 16 बी सी 0197) त्यांना धडक दिली. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या. अपघात होताच कार चालक घटनास्थळावरून पसार झाला.
याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी सौ. मंगल भोसले यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंड विधान कायदा कलम 279, 337, 338, मोटार वाहन कायदा कलम 134 (अ) (ब), 177, 184 प्रमाणे अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास सहाय्यक फौजदार अनिल भोसले हे करीत आहेत.

Tags:
Crime