पोलीस रेझिंग डे निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन

पोलीस रेझिंग डे निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन
नगर (दि.04) प्रतिनिधी -
 पोलीस स्थापना दिनानिमित्त अहमदनगर पोलीस दलाने विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमा दरम्यान मंगळवारी (दि.7) खुल्या गटासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस विभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
पोलीस स्थापना दिनानिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमात पोलीस अधिकारी व कर्मचार्यांबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये संवेदनशीलता निर्माण व्हावी व पोलीस आणि जनतेमध्ये जवळीक वाढवून पोलीस विभागाचे विविध सामाजिक उपक्रम जनतेमध्ये पोहोचवावेत या उद्देशाने या कार्यक्रमात खुल्या गटासाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या विषयावर लिखाण करुन स्पर्धकांनी मंगळवार (दि.7) पर्यंत पोलीस उपअधीक्षक यांच्या कार्यालयात जमा करावेत. या स्पर्धेत ‘समाजातील पोलिसांची सकारात्मक प्रतिमा’, ‘वाहतूक समस्या निवारणा करीता माझा आवश्यक सहभाग‘, ‘सोशल मिडीया व गुन्हेगारी’ यापैकी एका विषयावर निबंध मागविण्यात आले आहेत.
नगर पोलीस दलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धा या सामाजिक उपक्रमाचा उद्देश पोलीस व नागरिकांचा सुसंवाद वाढवावा असे असून या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी केले आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post