नगर (दि.03) प्रतिनिधी -
बोलेरो जीपमधुन आलेल्या तीन अनोळखी इसमांनी मारहाण करून 12 हजार रूपये रोख व 1 हजार रूपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने चोरून नेल्याची घटना नगर-कल्याण रोडवरील सागर भेळ सेंटरसमोर घडली. ही घटना सोमवारी (दि.6) रात्री 9.30 च्या सुमारास घडली. या मारहाणीत युवकास गंभीर मार लागला आहे.
शुभम गेणु देशमुख (वय 23, रा. टाकळी ढोकेश्वर) हा त्याच्या गावी जात असताना नेप्ती शिवारातील रोडवर भेळ खाण्यासाठी थांबला. त्यानंतर घराकडे जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभा राहिला. तेथे पांढर्या रंगाची बोलेरो गाडी आली. गाडीतील 3 अनोळखी इसमांनी त्यास अचानक मारहाण केली व त्याच्या जवळील 12 हजार रूपये रोख व 1 हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावुन घेतला. त्यानंतर शुभम हा गाडीच्या खाली उतरला व सागर भेळ सेंटरजवळुन पायी जात असताना नगरकडुन येणार्या नंबर नसलेल्या मोटारसायकलने त्यास जोराची धडक दिली. या धडकेत तो गंभीर जखमी झाला.
याप्रकरणी शुभम देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 392, 279, 338, 323, 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जारवाल हे करीत आहेत.

Tags:
Crime