नगर (दि.03) प्रतिनिधी -
नगर शहरातील एका नामांकीत बँकेच्या वसुली कर्मचार्यांना कर्जदाराकडून शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्याचा प्रकार शुक्रवारी (दि.3) दुपारी घडला.
शहरातील एका नामांकीत बँकेने थकीत कर्ज वसुलीसाठी सध्या जोरदार मोहिम सुरू केलेली आहे. थकबाकीदार कर्जदार्यांच्या मालमत्ता सील करुन जप्त करण्याची कार्यवाही केली जात आहे. या बँकेचे वसुली पथक शुक्रवारी दुपारी एका थकबाकीदार असलेल्या कर्जदाराकडे वसुलीसाठी गेले होते. या पथकातील एका कर्मचार्याने कर्जदारास थकीत कर्जाच्या रकमेची मागणी केली. त्याचा राग आल्याने त्याने त्या कर्मचार्यास शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. भर रस्त्यातच हा प्रकार झाल्याने तेथे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. सदर धक्काबुक्की झालेला कर्मचारी हा एका संचालकाचा नातेवाईक आहे.
याबाबतची माहिती बँकेतील अधिकारी तसेच संचालकांना समजताच त्यांनी वसुली पथकातील कर्मचार्यांशी संपर्क साधून विचारपूस केली. तसेच याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला. त्यानुसार धक्काबुक्की झालेला कर्मचारी पोलीस ठाण्यात गेला मात्र ही बाब समजताच सदरील थकबाकीदार कर्जदाराने बँकेत जावून प्रकरण मिटवून घ्या, असे म्हणत बँकेतच ठाण मांडले होते. या प्रकाराची शहरात जोरदार चर्चा रंगली होती. दुपारी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात याबाबत कसलीही नोंद झाली नव्हती.

Tags:
Crime