। अहिल्यानगर । दि.02 जुन 2026 । समृद्धी महामार्गावर वाहने अडवून मारहाण करून लुटमार करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 4 दिवसांत जेरबंद केली. सदरच्या कारवाईत 6 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 9,28,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
माहिती अशी की, फिर्यादी दत्ता बाबुराव राजुळे रा. लांबोटा, ता. निलंगा जि. लातुर हे दिनांक 27 मे 2026 रोजी दुपारी 03/00 वा.चे सुमारास त्यांचेकडील ट्रकमधुन डिझेल घेवुन जात असतांना 7 ते 8 आरोपींनी येवुन फिर्यादीस समृध्दी महामार्ग पोल येथे लोखंडी रॉर्डने मारहाण करुन गाडीमधील डिझेल तसेच फिर्यादीकडील रोख रक्कम असा एकुण 7465/- रुपये किमतीचा मुद्देमाल घेवुन गेले.
तसेच वॅगनर कारचालकाची गाडी अडवुन गाडीमधील चालकास व त्याचे पत्नीस दमदाटी करुन त्यांचेकडील 1,24,000/- रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम काढुन नेली. त्यानंतर त्याच आरोपींनी पुन्हा समृध्दी महामार्गावर ट्रक क्रमांक बी. आर. 03 जी. बी. 4883 हिचेवरील चालकाला मारहाण करुन त्यांचे गाडीतील 150 लिटर डिझेल व 4100/- रोख रक्कम असा 18,950/- रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला आहे.
समृध्दी महामार्गावर 8 ते 10 आरोपींनी 03 वेगवेगळी वाहने अडवुन त्यावरील चालकांना मारहाण करुन त्यांचेकडील एकुण 1, 50, 415/- रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडा टाकुन चोरुन नेला आहे. सदर घटनेबाबत कोपरगांव तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 227/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310(2), 118(1), 351(1), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन गुन्हा घडल्यानंतर तात्काळ पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. किरणकुमार कबाडी यांनी घटनाठिकाणी भेट देवुन घटनाठिकाणची पाहणी केली. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेस आदेश देण्यात आलेले होते.
सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार विजय पवार, फुरकान शेख, भिमराज खर्से, राहुल डोके, सतिष भवर, रोहित येमुल, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, महादेव भांड यांचे पथक तयार करुन सदर पथकास गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन मालमत्ता हस्तगत करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना करण्यात आले.
वर नमुद पथकाने घटनाठिकाणची पाहणी करुन तसेच फिर्यादी यांचेकडे आरोपींचे वर्णनाबाबत विचारपुस करुन माहिती संकलित केली. सदर माहितीचे आधारे तसेच व्यवसायीक कौशल्याचे आधारे आरोपींचा शोध घेत असतांना दिनांक 01 जुन 2026 रोजी पथकास सदर गुन्ह्यातील काही आरोपी हे अंबड जि. जालना परिसरामध्ये असल्याची माहिती प्राप्त झाली.
सदर प्राप्त माहितीचे आधारे अंबड जि. जालना येथुन आरोपी नामे 1) निखील बद्रीनारायण गोरे वय 19 वर्षे, रा. नुतन वसाहत, अंबड, जि. जालना, 2) विधीसंघर्षीत बालक वय 17 वर्षे, यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस करता त्यांनी सदर गुन्हा हा त्यांचे इतर साथीदारांसह केल्याची कबुली दिली. सदर आरोपींचे साथीदारांचा शोध घेत असतांना दिनांक 02/06/2026 रोजी कोकमठाण, ता. कोपरगांव या ठिकाणावरुन 3) शिवनाथ शांताराम आव्हाड वय 24 वर्षे, रा. संतनगर, शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर, मुळ रा. जातेगांव टेमभी, ता. वैजापुर, जि. छ. संभाजीनगर,
4) ओम बालाजी खरात वय 19 वर्षे, रा. मोतीबाग, तुलसिपार्क, भवानीनगर, ता. जि. जालना, हल्ली रा. कांचनवाडी, देवभारती हॉस्पीटल जवळ संभाजीनगर,5) राहुल साधाकिसन कोकाटे वय 23 वर्षे, रा. पांग्रा, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर, मुळ रा. रांजणगांव, ता. बदनापुर, जि. जालना, 6) साईराज गणेश शहाणे वय - 21 वर्षे, रा. गोशाळा जवळ, साकुरी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर यांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांचेकडे त्यांचे इतर साथीदाराबाबत विचारपुस करता त्यांनी गुन्ह्याचे वेळी त्यांचे सोबत इतर तीन इसम यांचेसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. ताब्यातील आरोपींचे कब्जातुन व्हेरना, स्विफ्ट कार, 06 मोबाईल, रोख रक्कम असा एकुण 9,28,600/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपी व मुद्देमाल गुन्ह्याचे पुढील तपासकामी कोपरगांव तालुका पोलीस ठाणे येथे हजर करुन अटक करण्यात आली असुन पुढील तपास कोपरगांव तालुका पोलीस ठाणे हे करीत आहे. सदरची कारवाई मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
