किराणा दुकान जळीत गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद


। अहिल्यानगर ।  ०3 नोव्हेंबर २०२५ । आव्हने (ता. शेवगाव) येथील साई गणेश किराणा दुकान जळीत गुन्ह्यातील दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

दि.19 ऑक्टोबर रोजी रात्री 1.49 वा. आव्हने ता.शेवगाव येथील साई गणेश किराणा दुकान नष्ट करण्याच्या उद्देशने तीन अनोळखी इसमांनी त्यांच्याकडील बॉटलमधुन पेट्रोल-डिझेल सदृष्य ज्वालाग्राही द्रव दुकानाच्या शटरवर ओतुन किरणा दुकान पेटवून देऊन दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. 

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हरिष भोये व पोलीस अंमलदार राहुल द्वारके, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, रिचर्ड गायकवाड, बाळासाहेब नागरगोजे, जालिंदर माने,

किशोर शिरसाठ, प्रमोद जाधव, सोनल भागवत, चंद्रकांत कुसळकर तसेच शेवगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक रामहरी खेडकर, पोलीस अंमलदार नकुल फलके, दादासाहेब खेडकर यांच्या पथकाने आरोपींना जेरबंद केले.

पथकाने नगर शहरातील तपोवन रोड येथे सापळा लावुन दोन इसमांना ताब्यात घेतले. त्यांनी त्यांचे नाव निलेश शिवाजी नेहुल (वय 26, रा. आव्हाने बु. ता. शेवगाव), बवाज उर्फ गौरव सॅमसन उजागरे (वय 24, रा. उजागरे मळा, बुरुडगाव) असे असल्याचे सांगितले. 

त्यांनी सांगितले की, आम्ही दोघे व अभिषेक बाळसाहेब साळवे (रा. झोपडपट्टी, बुरुडगाव) (पसार) अशांनी मिळुन गुन्हा केल्याचे सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post