अहिल्यानगरच्या कन्येकडे डॉक्टर महिला आत्महत्येचा तपास!

 

 | मुंबई | दि. ०२ नोव्हेंबर २०२५ | फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी राज्य सरकारच्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) नेतृत्व आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते करणार आहेत. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शनिवारी आदेश काढला.

हा संपूर्ण तपास महिला आयपीएस अधिकार्‍याच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाकडून केला जाईल, जेणेकरून प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.
 
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येनंतर खळबळ उडाली. आत्महत्येपूर्वी तिने आपल्यावर विरष्ठांचा आणि पोलिसांचा दबाव असल्याचे नमूद करण्यात आली होती.अखेर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि विरोधकांची मागणी मान्य करत, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्याचे निर्देश दिले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कन्या आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते या त्यांच्या कार्यक्षमतेमुळे आणि ‘लेडी सिंघम’ या नावाने ओळखल्या जातात. आता त्यांच्याकडे फलटण येथील डॉक्टर महिला आत्महत्येचा तपास देण्यात आला आहे. 

तेजस्वी सातपुते या मूळच्या पाथर्डी तालुक्यातील आहेत. त्यांचा जन्म शेवगावात झालेला आहे. त्यांनी स्थानिक ज्ञानदीप विद्या मंदिरातून प्राथमिक शिक्षण, बाळासाहेब भारदे हायस्कूलमधून मराठी माध्यमातून माध्यमिक शिक्षण घेतलेले आहे. त्यांनी जळगाव, जालना, पुणे शहर आणि सोलापूर यासह अनेक ठिकाणी काम केले आहे, 

Post a Comment

Previous Post Next Post