| नागपूर | दि.३० ऑक्टोबर २०२५ | शेतकर्यांना कर्जमाफी करण्यास सरकार टाळाटाळ करत असून अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळालेली नाही, कर्जमाफी, शेतकर्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी एल्गार पुकारला आहे. शेतकर्यांचे आंदोलन बुधवारी दुसर्या दिवशीही सुरूच राहिले.
शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आला आहे.आंदोलक शेतकर्यांनी राज्यातील कर्जबाजारी शेतकर्यांसाठी तत्काळ आणि बिनशर्त कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे. शेकडो शेतकरी नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर (एनएच-४४) जमले आणि वाहतूक रोखली.
👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलनस्थळ सोडावे, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेत. मात्र, अद्याप कोर्टाचे आदेश मिळाले नाहीत. ते आल्यानंतर पाहू. कोर्टाच्या आंदोलनाला मान सन्मान देऊन आपल्या आंदोलनाचा पुढचा पवित्रा ठरवू, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. नागपूरमध्ये हजारो शेतकर्यांनी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्याच्या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली जात आहेत.
Tags:
Maharashtra
