जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर...


। मुंबई । 12 सप्टेंबर । अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदासाठी आरक्षणाची घोषणा  आज केली आहे.

👉 क्लिक करुन वाचा...  

राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगासोबतच राजकीय पक्षांच्या हालचालींनाही वेग आला असून, नेतेमंडळी नियोजन आखत आहेत.

👉 क्लिक करुन वाचा...  

गेल्या काही आठवड्यांपासून अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीची प्रतिक्षा सुरु होती. आयोगाने आरक्षण जाहीर केल्यामुळे आता राजकीय गणितं आखण्यात पक्षांना मोठी मदत होणार आहे. यामुळे निवडणुकीचा रंग अधिक गडद होणार असून, लवकरच निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

👉 क्लिक करुन वाचा...  

जिल्हा परिषद अध्यक्षपदांच आरक्षण जाहीर-

👉 ठाणे -सर्वसाधारण (महिला), 

👉 पालघर – अनुसुसूचित जमाती, 

👉 रायगड- सर्वसाधारण,

👉 रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), 

👉 सिंधुदुर्ग – सर्वसाधारण, नाशिक -सर्वसाधारण, 

👉 धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला),

👉  नंदूरबार-अनुसूचित जमाती, जळगाव – सर्वसाधारण, 

👉 अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला),

👉 पुणे -सर्वसाधारण, 

👉 सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), 

👉 सांगली – सर्वसाधारण (महिला), 

👉 सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग,  

👉  कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला), 

👉 छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण, 

👉 जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), 

👉 बीड – अनुसूचित जाती (महिला), 

👉 हिंगोली -अनुसूचित जाती, 

👉 नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग, 

👉 धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), 

👉 लातूर – सर्वसाधारण (महिला), 

👉 अमरावती – सर्वसाधारण (महिला), 

👉 अकोला – अनुसूचित जमाती (महिला), 

👉 परभणी – अनुसूचित जाती,

👉 वाशिम अनुसूचित जमाती (महिला), 

👉 बुलढाणा -सर्वसाधारण, 

👉 यवतमाळ सर्वसाधारण, 

👉 नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग, 

👉 वर्धा- अनुसूचित जाती, 

👉 भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग, 

👉 गोंदिया – सर्वसाधारण (महिला), 

👉 चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला),

👉  गडचिरोली -सर्वसाधारण (महिला).

 

Post a Comment

Previous Post Next Post