सामाजिक बांधिलकीची जपवणूक करत वाढदिवस केला साजरा

| अहिल्यानगर | दि.१२ सप्टेंबर २०२५ | अरणगाव येथील उपक्रमशील शिक्षक प्राध्यापक अमोल देवकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या वतीने नुकतेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

जनजीवन माध्यमिक विद्यालय बुरुडगाव या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये गोडी वाढवावी यासाठी त्यांना विविध प्रेरणादायी सुविचारांचे फ्लेक्स बोर्ड भेट देण्यात आले. सदरहू प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक झिने  सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा परिषद शिक्षक पुरस्कारांचे वितरण

त्याचप्रमाणे आरणगाव येथील संस्कार प्ले ग्रुप व नर्सरी स्कूल तसेच डॉक्टर श्रद्धा डेंटल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने अरणगाव तसेच परिसरातील विद्यार्थी व नागरिकांसाठी मोफत दंतरोग चिकित्सा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर श्री सांदीपाणी अकॅडमी अहिल्यानगरचे संचालक डॉ. के. बाल राजू, प्राध्यापक नानासाहेब बराटे, डॉ. श्रध्दा धोत्रे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय ससाने आदी मान्यवरांचा सत्कार वृक्षारोपणासाठी विविध रोपे देऊन संचालिका प्राध्यापिका अमृता अमोल देवकर यांच्यावतीने करण्यात आला आहे.

👉 क्लिक करुन वाचा...  

Post a Comment

Previous Post Next Post