| नागपुर | दि.०५ सप्टेंबर २०२५ | मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी महासंघाने विरोध करत नागपुरात साखळी उपोषण सुरू केले होते. अखेर गुरूवारी उपोषणाच्या पाचव्या दिवशी ओबीसी महासंघाचे उपोषण मागे घेण्यात आले. मंत्री अतुल सावे आणि आमदार परिणय फुके यांनी यासंदर्भात मध्यस्थी केली.
यावेळी ओबीसींच्या १४ मागण्यांपैकी १२ मागण्या मान्य करण्यात आल्या असून, पुढील एक महिन्यात यासंदर्भातील शासन निर्णय काढणार असल्याचे आश्वासन यावेळी उपोषण कत्यारना देण्यात आल्यानंतर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी उपोषण थांबवण्याची घोषणा केली.
हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागेल, असा आरोप ओबीसींकडून करण्यात येत होता. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपुरात सुरू केलेल्या साखळी उपोषणाच्या ठिकाणी आज मंत्री अतुल सावे आणि परिणय फुके यांनी भेट दिली
Tags:
Maharashtra
