जिल्ह्यात लेझर लाईट, दबाव हॉर्न व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर मनाई

जिल्ह्यात लेझर लाईट, दबाव हॉर्न व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर ८ सप्टेंबरपर्यंत मनाई


| अहिल्यानगर | दि.०5 सप्टेंबर 2025 | भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. 

हे आदेश अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगणेशोत्सव व ईद-ए-मिलाद २०२५ या कालावधीत लेझर लाईट, दबाव हॉर्न (प्रेशर मिड) व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर लागू राहतील. हे आदेश ३ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर २०२५ या कालावधीसाठी प्रभावी असतील.

जिल्ह्यातील मिरवणुकांमध्ये काही मंडळांकडून लेझर लाईट, दबाव हॉर्न (प्रेशर मिड) व कार्बन डायऑक्साइड वायूचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या वापरामुळे मिरवणूक बघण्यासाठी जमलेल्या ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांच्या आरोग्य व सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

विशेषतः अशा साधनांच्या वापरामुळे मानवी श्वसन संस्थेला हानी पोहोचणे, हृदयाचे ठोके वाढणे, कानाच्या पडद्यांवर तसेच लहान मुलांच्या डोळ्यांवर बरे न होणारे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. परिणामी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ शकते.


Post a Comment

Previous Post Next Post