मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात जाणार : मंत्री भुजबळ

 

| मुंबई | दि.०४ सप्टेंबर २०२५ | मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या असून मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट मान्य करत तसा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयाला मंत्री छगन भुजबळ यांना जोरदार विरोध केला असून,सरकार एका जातीला दुसर्‍या जातीत टाकू शकत नसल्याची भूमिका मांडत आपण शासन निर्णयाच्या विरोधात न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले. 

शिवाय त्यांनी कॅबिनेटच्या बैठकीला दांडी मारून आपला रोष प्रगट केल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात बोलतांना मंत्री भुजबळ म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात काल जो जीआर काढण्यात आला त्यांच्याबद्दल आम्ही ओबीसीचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या मनात फार मोठ्या शंका आहेत. 

आम्ही विचार करत आहोत, कोण हरले का? कोण जिंकले का?, या बाबत आम्ही वकिलांचा सल्ला घेत आहोत. कारण कुठल्याही जातीला उचलून दुसर्‍या जातींमध्ये टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही. भुजबळ हे मराठा आरक्षणाच्या जी आरमुळे नाराज झाल्याने त्यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकल्याची चर्चा आहे. 

👉 क्लिक करुन वाचा...  

Post a Comment

Previous Post Next Post