। मुंबई । दि.03 सप्टेेबर 2025 । मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन आदेश जारी करण्यात आला. यानंतर आज (दि.03) राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसी समाजासाठीही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ओबीसींच्या प्रश्नाबाबत एका उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे
मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांसाठी राज्य सरकारने उपसमितीची गठीत केली होती. या उपसमितीचे अध्यक्षपद मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आले. त्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणानंतर सरकारने जीआर काढले आहेत. त्यामुळे ओबीसी समाजात नाराजी पसरली आहे. आता ओबीसी समाजासाठीही मंत्रिमंडळाने उपसमिती स्थापन करण्याला मान्यता दिली आहे.
Tags:
Breaking
