केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन


| मुंबई | दि.०१ सप्टेंबर २०२५ | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुंबईतील मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते ‘श्रीं’ची पूजा करण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार रवींद्र चव्हाण, अमित साटम, स्थानिक लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते. 

 

Post a Comment

Previous Post Next Post