मराठा आरक्षण आंदोलनाचे नेेते जरांगे पाटील यांचे नेप्ती चौकात होणार स्वागत
मराठ्यांचे भगवे वादळ नगरमध्ये
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेेते जरांगे पाटील हे आपल्या ताफ्यासह नगरमध्ये दाखल होणार आहेत. मराठा समाजाच्यावतीने त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
दि. 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर हे आंदोलन होणार आहे. जरांगे पाटील हे नगरमार्गे मुंबईला जाणार आहेत. त्यावेळी कल्याण रोडवरील नेप्ती चौकात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. पैठण मार्गे बोधेगावातून नगर जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत.
तेथून शेवगाव, मिरी- माका, पांढरीपूल, शेंडी बायपास, दुधडेअरी चौक, सनफार्मा चौक, निंबळक चौक, बायपासमार्गे नेप्ती चौकात आल्यानंतर जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. जरांगे पाटील यांच्यासोबत वाहनांतून मराठा समाज बांधव मुंबईकडे जाणार आहेत.
ही रॅली पैठण मार्गे अहिल्यानगर जिल्ह्यातील कहेटाकळी (ता. शेवगाव) येथून सुरू होऊन घोटण, तळणी, शेवगाव शहर, वडुळे, ढोरजळगाव, निंबे नांदूर, मिरी, दत्ताची शिंगवी, माका, पांढरी पूल, जेऊर, शेंडी बायपास, दुधदेरी चौक, नवनागापूर एमआयडीसी, निंबळक बायपास, नेप्ती, भाळवणी, टाकळीढोकेेशर, कर्जुले हर्या, काळेवाडी (ता. पारनेर) मार्गे आळेफाटा (जि. पुणे) येथे जाईल.
