अंतिम गट, गण रचना प्रसिध्द ; आता आरक्षण सोडतीकडे लक्ष !


| अहिल्यानगर | 20 ऑगस्ट 2025 | जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या गट आणि गणांची अंतिम  रचना आज जिल्हा प्रशासनाने प्रसिध्द केली आहे. नव्याने झालेल्या गट आणि गणांच्या रचनेमुळे इच्छुकांमध्ये कही खुशी कही गम अशी स्थिती आहे. दरम्यान, अंतिम गट व गण रचना प्रसिध्द झाल्याने आता गट व गणांच्या आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. गावपुढारी या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. 

👉 क्लिक करुन वाचा...  

जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे दोन गट आणि चार गण वाढले आहेत. किरकोळ बदल वगळता गट आणि गण रचना जैसे थे आहे. आता लवकरच आरक्षण सोडत जाहीर केली जाणार आहे. या आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने गावपुढार्‍यांनी जनसंपर्क वाढविला आहे. विविध कार्यक्रमांना हजेरी लावली जात आहे. 

👉 क्लिक करुन वाचा...  

अडीच वर्षापासून जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडल्या होत्या. त्यामुळे गावपुढार्‍यांमध्ये निरूत्साह होता. आता लवकरच निवडणुका होणार असल्याने त्यांच्यामध्ये उत्साह संचारला आहे. दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 75 गट आणि पंचायत समित्यांचे 150 गण झाले आहेत. 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे 73 गट आणि पंचायत समित्यांसाठी 146 गण होते. 

👉 क्लिक करुन वाचा...  

Post a Comment

Previous Post Next Post