स्वातंत्र्यदिनी ग्रामीण भागात महावितरण करणार सौर योजनांचा जागर

 


| अहिल्यानगर | 15 ऑगस्ट 2025 |  ग्रामीण भागातील वीज ग्राहकांच्या जीवनात अमुलाग्र बदल करणार्‍या  प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजना, प्रधानमंत्री कुसुम योजना 2.0 आणि मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेची माहिती वीज ग्राहकांना देण्यासाठी सौर योजनांचा ग्रामीण भागात आज जागर करण्यात येणार आहे. 

यासाठी महावितरणचे विविध अभियंते व अधिकारी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने  दिनांक १५ ऑगस्ट रोजी नाशिक  जिल्ह्यातील विविध ग्राम पंचायतीमध्ये ग्रामसभेत ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

राज्यात नुकतेच महावितरणने सौर ऊर्जा क्षेत्रात सूर्यघर वीज मोफत योजनेच्या माध्यमातून १००० मेगावॅट वीज निर्मितीचा टप्पा गाठला आहे.सौर सौर ऊर्जा प्रकल्पांना आणखी गतिमानता यावी तसेच  शासनाच्या सौर योजनांचा जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी लाभ घ्यावा. 

तसेच या योजनेत सहभागी झाल्यावर मिळणाऱ्या फायद्याची माहिती ग्रामिण भागातील वीज ग्राहकांना देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच यावेळी योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांचे अर्ज व आवश्यक कागदपत्रे सुद्धा स्विकारले जाणार आहेत.

महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्यासह अधिक्षक अभियंते राजेश थूल व जगदीश इंगळे, कार्यकारी अभियंते, उपविभागीय अधिकारी, शाखा अभियंता आपल्या कार्यक्षेत्रातील ग्राम पंचायतीच्या ग्रामसभेस उपस्थित राहून संवाद साधणार आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post