लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास सुरूवात!

लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास सुरूवात!


। मुंबई । दि. 06 जून 2025 । मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याचा 11 वर हप्ता केव्हा मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींकडून उपस्थित केला जात होता. मात्र या हप्त्याची पैसे गुरूवारपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग

महायुती सरकारने गतवर्षी जुलै महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. तेव्हापासून आतापर्यंत महिलांना 10 हप्ते मिळालेत. पण मे महिना संपला तरी अद्याप महिलांना 11 वा हप्ता मिळाला नव्हता. पण आता हा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग

लाभार्थी महिलांना तसे मेसेज मिळण्यास सुरूवात झाली आहे. मंत्री तटकरे यांच्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा निधी आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होत आहेत. त्यामुळे एखाद्या लाभार्थी महिलेला पैसे जमा झाल्याचा मेसेज आपला नसेल तर त्यांनी बँकेत जाणून आपल्या खात्याची स्थिती जाणून घ्यावी. 

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग

संबंधित बँकेचे अ‍ॅप असेल तर त्यातही त्यांना हा निधी जमा झाला किंवा नाही हे पाहता येईल. तूर्त या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या लाखांत असल्यामुळे सर्वांच्या खात्यात पैसे जमा होण्यास 3-4 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.



Post a Comment

Previous Post Next Post