। अहिल्यानगर । दि.07 जुन 2025 । सैनिक कल्याण कार्यालय येथे बुधवार दि.11 जून रोजी शहीद स्मारक अनावरण व लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.नगर जिल्ह्यात शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ शहीद स्मारक आणि सैनिक विश्राम गृहाचे उदघाटन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात अनेक प्रतिष्ठित पाहुण्यांचा समावेश असणार आहे.जनरल विक्रम वर्मा, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पद्मश्री डॉ. पोपटराव पवार, ब्रिगेडियर सुनील कुमार,जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, आदर्शगाव हिवरेबाजार येथील एनसीसी छात्र यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.कार्यक्रमात वीरपत्नी, वीरमाता आणि वीरपिता यांचा सन्मान केला जाणार आहे.
Tags:
Ahmednagar