| मुंबई | दि.१८ जुन २०२५ | ठाकरे गटाचे नाशिक येथील नेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर मंगळवारी बडगुजर यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत मुंबई येथील भाजप कार्यालयात जाऊन पक्ष प्रवेश केला आहे.
यावेळी हजारोंच्या संख्येने बडगुजर यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. नरीमन पॉइंट येथील भाजप कार्यालयाच्या रस्त्यावर ढोल ताशे वाजवत हजारो कार्यकर्त्यांसह सुधाकर बडगुजर उपस्थित झाले होते. त्यानंतर भाजप कार्यालयात त्यांनी प्रवेश केला.
परंतु यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व रवींद्र चव्हाण हे लवकर न पोहोचल्याने सुधाकर बडगुजर यांना ताटकळत थांबावे लागल्याचे दिसून आले. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी बोलतांना बडगुजर म्हणाले की, मी चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र महाजन यांचे मी मनापासून आभार मानतो.
गिरीश महाजन खरोखरच संकटमोचक आहेत आणि त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन आहे. आपत्ती आली की ते मार्ग काढतातच आणि माझ्याबाबतीत त्यांनी मार्ग काढला, असे म्हणत सुधाकर बडगुजर यांनी कौतुक केले आहे.