राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाला शरद पवारांकडून ब्रेक!

👉 क्लिक करुन वाचा...


| मुंबई  | दि.१८ जुन २०२५ | गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँगे्रसचे मनोमिलन होवून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी अटकळ बांधली जात होती, मात्र मंगळवारी खा. शरद पवार यांनी या चर्चांना बे्रक लावत आपण कदापीही भाजपसोबत युती करणार नसल्याचे ठणकावून सांगितले.

👉 क्लिक करुन वाचा...

संधिसाधूपणा करणार्‍यांना सोबत घेणार नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. कोणासोबतही युती करा, मात्र भाजपसोबत नाही, असा थेट इशाराच शरद पवार यांनी दिला आहे.

👉 क्लिक करुन वाचा...

या संदर्भात शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना ब्रेक लागला आहे. वास्तविक हा निर्णय सुप्रिया सुळे घेणार असल्याचे शरद पवार यांनी याआधी सांगितले होते. 

👉 क्लिक करुन वाचा... 

मात्र, सुळे यांनी अशा युतीला स्पष्ट शब्दात नकार दिला होता. आता थेट शरद पवार यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला ब्रेक लागला आहे.

  👉 क्लिक करुन वाचा...

Post a Comment

Previous Post Next Post