। वृत्तसंस्था । दि.22 एप्रिल 2025 । जम्मू-कश्मीर येथील पहलगाम जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी मंगळवारी (दि.22 एप्रिल 2025) रोजी अतिरेक्यांनी अमानुष गोळीबार केला.
या दहशतवादी हल्ल्यात 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळात आहे. तसेच या हल्ल्यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे.
जम्मू-कश्मीरातील पहलगाम येथे पर्यटकांना त्यांची नावे विचारुन टार्गेट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदीवरुन फोन करुन गृहमंत्री अमित शाह यांना पहलगामला जाण्याचे आदेश दिले आहेत.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
Tags:
Breaking