महाराष्ट्र पोलीस दलामध्ये शोककळा ; आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन

 |  हैद्राबाद | दि.३० मार्च २०२५   आयपीएस अधिकारी आणि मुंबई पोलीस दलातील डीसीपी सुधाकर पठारे यांचं रस्ते अपघातामध्ये निधन झालं आहे. सुधाकर पठारे हे ट्रेनिंगसाठी हैद्राबादला गेले होते.

तेलंगणा येथून श्रीशैलम येथून पठारे नागरकुरलूकडे जात होते, तेव्हा त्यांच्या कारचा अपघात झाला, या अपघातामध्ये सुधाकर पठारे यांचा जागीच मृत्यू झाला.

आयपीएस डॉ. सुधाकर पठारे हे अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यातील वाळवणेचे रहिवासी होते. त्यांनी एम. एस्सी.अग्री, एलएलबी केले होते. शासनाच्या अनेक खात्यांमध्ये ते अधिकारी राहिले होते. 

स्पर्धा परीक्षेद्वारे ते १९९५ मध्ये जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले तर १९९६ मध्ये विक्रीकर अधिकारी १ म्हणून कार्यरत होते. पोलिस खात्यात ते १९९८ मध्ये पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत झाले.

त्यांनी उपअधीक्षक म्हणून कोल्हापूर शहर, पंढरपूर, अकलूज इत्यादी ठिकाणी सेवा बजावली.शासनाच्या अनेक खात्यांमध्ये ते अधिकारी राहिले होते.  कायदा  व सुव्यवस्था  अबाधित राखण्याबरोबरच त्यांनी पोलिस दलात अनेक विविध उपक्रम राबवले आहेत.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

Post a Comment

Previous Post Next Post