। मुंबई । दि.06 डिसेंबर 2024 । हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. सर्व मंत्र्यांच्या कामाचे मूल्यांकन करुन निर्णय घेतला जाईल, तिन्ही पक्षांना मंत्रिपदे द्यायची असल्याने काही प्रमाणात मागे पुढे होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शनिवारी महायुतीच्या नेत्यांची बैठक असल्याचेही समोर आले आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली असून यामध्ये 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रिपदाचे चेहरे निश्चित झाल्याचे सूत्रांची माहिती आहे.
Tags:
Politics