। अहिल्यानगर । दि.06 डिसेंबर 2024 । महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदिवासी समाजाचे नेते, भाजपा नेते मधुकरराव पिचड यांचे वयाचे ८३ व्या वर्षी नाशिक येथे आज सायंकाळी ६. ३० वा निधन झाले आहे. गेले दिड महिन्यापासून ते बेनस्ट्रोक मुळे आजारी होते.
राजूर येथील काशिनाथ पिचड या प्राथमिक शिक्षकाचे घरात त्यांचा जन्म झाला. पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालय त उच्च शिक्षण घेऊन मधुकराव पिचड हे तालुक्याच्या राजकारणात आले. मधुकरराव पिचड यांची 1972 ला अकोले जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड झाली.
1972 ते 1980 या काळात ते पंचायत समितीचे सभापती होते. 1980 ते 2009 असे सलग 7 वेळा आमदार झाले. मधुकर पिचड यांचा जीवनप्रवास अतिशय खडतर राहिला आहे. राज्याच्या राजकारणात त्यांनी वेगवेगळ्या टप्प्यावर काम केलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून त्यांनी शरद पवारांना साथ दिली. ज्यामध्ये ते 7 वेळा आमदार राहिले आहेत. एकुणात पंचायत सभापती ते मंत्री असा प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेला नेता आज आपल्यातून निघून गेला आहे. दरम्यान मधुकर पिचड यांच्या जाण्याने चिरंजीव वैभव पिचड यांच्यासह कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय.