। अहिल्यानगर । दि. 28 डिसेंबर 2024 । अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे लॉक तोडून लॅपटॉप, फ्रीज, टेबल व खुर्च्या असा 13 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. केडगाव उपनगरातील नवीन गावठाण येथे 23 डिसेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
याप्रकरणी 25 डिसेंबर रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुर राजेंद्र गुंड (वय 24 रा. गुंड मळा, सोनेवाडी रस्ता, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी नवीन गावठाण परिसरात घर खरेदी केले आहे. तेथे ते व त्यांचा मित्र अभ्यास करतात.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
23 डिसेंबर रोजी ते घर बंद होते. त्यावेळी एक महिला व एक पुरूष यांनी घराचे लॉक तोडून साहित्य चोरून नेले. सदरचा प्रकार फिर्यादीच्या ओळखीच्या व्यक्तीने पाहिला व त्यांनी फिर्यादीला माहिती दिली. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags:
Ahmednagar
