हॉटेलमधील कुंटणखान्यातून तीन पीडित महिलांची सुटका

| अहमदनगर | दि.13 जुलै २०२४ | श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री शिवारात एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर धाड टाकून तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (एएचटीयू) ही कारवाई केली. या प्रकरणी किरण रावसाहेब जरे (वय 39 वर्षे रा. वारूळाचा मारूती, नालेगाव, नगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

👉 शिर्डीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्दीतील बनपिंप्री येथील हॉटेल सुप्रीम येथे कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून एएचटीयू पथकाने पहाटे 4 वाजता अचानक छापा टाकून तीन पीडित महिलांची सुटका केली. कुंटनखाना चालवताना मिळून आल्या प्रकरणी आरोपी जरेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईत 4 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

👉 सोन्याच्या दराला पुन्हा झळाळी!

पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विवेकानंद वाखारे, एएचटीयूचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंद्याचे पोनि ज्ञानेश्वर भोसले, पोसई बाळासाहेब शिंदे, पोहेकॉ समीर सय्यद, मपोहेकॉ अर्चना काळे, मपोकाँ छाया रांधवन, चालक पोकॉ काळे यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

👉 बायपासवर अपघात : दोन वाहन चालकांचा मृत्यू 

Post a Comment

Previous Post Next Post