सोन्याच्या दराला पुन्हा झळाळी!

। मुंबई । दि.10 जुलै 2024 । गेल्या महिन्याभरापासून सोन्याचे दर ७२ हजार रुपयांच्यावर स्थिरावले होते. मात्र गेल्या दोन दिवसात सोन्याच्या दरात दहा ग्रॅम शुद्ध सोन्याच्या साठी १५०० रुपयांची वाढ होऊन सोन्याचे दर हे जीएसटीशिवाय ७३ हजार ५०० रूपयांवर जाऊन पोहोचले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला सातत्याने झळाळी मिळाली.

जागतिक पातळीवर फेडरल बँकाचे व्याजदर कमी झाल्याने गुंतवणूकदार हे सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळले असल्याने, सोन्याच्या मागणीत वाढ होऊन सोन्याचे दर वाढले असल्याचे मानल जात आहे. सोन्याच्या वाढलेल्या या दराचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर देखील होतांना दिसत आहे.

गेल्या महिन्याभरापासून सोन्याचे दर हे ७२ हजार रुपयांच्या वर स्थिरावले होते. मात्र गेल्या दोन दिवसात सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम शुद्ध सोन्याच्या दरात १५०० रुपयांची वाढ झालीय. सोन्याच्या वाढलेल्या या दराचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर देखील होतांना दिसत आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post