| अहमदनगर | दि.10 जुलै २०२४ | अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी देविदास पवार यांची नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत त्यामध्ये फेरबदल करण्यात आला आहे. पवार यांनी सूत्रे ताब्यात घेण्याआधीच राज्य सरकारने नवा आदेश पारीत केला आहे.
आता अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी यशवंत डांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या यशवंत डांगे हे पिंप्री चिंचवड महापालिकेत साहाय्यक आयुक्त म्हणून सेवेत आहेत. नगरविकास खात्याच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी यांनी हा आदेश पारीत केला आहे. डांगे हे यापूर्वी नगरच्या पालिकेत सेवेत होते. कराड पालिकेतही त्यांनी काम केले आहे.
Tags:
Ahmednagar

