हिंदी अध्यापक संघाचे लोणावळा येथे दोन दिवसीय कार्यशाळा : डॉ. कांबळे

हिंदी अध्यापक संघाचे लोणावळा येथे दोन दिवसीय कार्यशाळा

आर्दश शिक्षक पुरस्काराचे होणार वितरण : डॉ. कांबळे


। अहमदनगर । 19 मे 2024 ।  महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचे राज्यस्तरीय दोन दिवशीय अधिवेशन दि. 27 व 28 मे 2024 रोजी लोणावळा येथे होणार असल्याची माहिती राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी दिली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे डॉ. विजयकुमार रोडे यांच्या हस्ते होणार आहे.

संघाचे मागील वर्षी सन 2023 मध्ये बारामतीयेथे मोठ्या उत्हासात दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली होती. यंदाचे संघाचे दोन दिवसीश कार्यशाळा लोनावळा येथे होणार आहे.दि. 27 मे रोजी सकाळी  11 वाजता डॉ. विजयकुमार रोडे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे राहणार आहेत. तर दुपारच्या सत्रामध्ये डॉ. विजयकुमार रोडे यांचे राष्ट्रीय शिक्षा नीतह 2024 और हिंदी भाषा याविषयावर व्याख्यान होणार आहे. तिसर्‍या सत्रामध्ये विभागीय अहवाल प्रस्तुतीकरण तर चौथ्या सत्रात काव्य संगोष्ठी आणि गीतांचा कार्यक्रम होणार आहे. 

दुसर्‍या दिवशी दि. 28 मे रोती सकाळी 7.30 वाजता योग साधना, सकाळी 9 वाजता विभागीय सदस्य मनोगत आणि नवीन राज्य कार्यकारिणीची निवड, नूतन राज्य कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार आहे. तसेच संघाच्या पुढील कार्यक्रमाची नियोजन तसेच विभाग अध्यक्षाचे मनोगत होणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये मनशक्ति तज्ञ प्रतिनिधीचे शिक्षक सक्षमीकरण विषयी व्याख्यान होणार आहे. त्यानंतर शेवटच्या सत्रात कार्यक्रमाचे समारोप करण्यात येणार असल्याची माहिती  राज्य सचिव प्रा. रेवणनाथ कर्डिले यांनी दिली आहे.  

या कार्यशाळेत संघाचे सल्लागार प्रा. संजय पवार, कार्याध्यक्ष प्रा. सुंदर लोंढे, सहसचिव प्रा. क्षमा करजगावकर, खजिनदार प्रा. आनंद काशीकर, उपाध्यक्ष प्रा. नंदा गायकवाड, डॉ. राजकुमार कांबळे, प्रा. इलाही मुलाणी, डॉ. वंदना पावसकर, प्रा. जावेद शेख, प्रा. विना सावंत, प्रा. संजय गावकर, प्रा. शेख हसन,  प्रा. मधुकर घुगे, सदस्य, डॉ. गोपाल बाहेती, डॉ. विनोद डोमकावळे, प्रा. संजय आरण्ये, प्रा. तानाजी पाटील,  प्रा. संजय पाटील, प्रा. रामदास मुंगसे, प्रा. सुनिल देशमुख, विभागीय अध्यक्ष डॉ. राजकुमार कांबळे, प्रा. लक्ष्मण नाईक, प्रा. मिनल्ला पिरजादे, प्रा. अनिल आठवले, डॉ. नेहा बोरसे, डॉ. राजेंद्र देवकाते, डॉ. विनोद डोमकांबळे, प्रा. तसमीन वोरा, प्रा. संजय पाटील उपस्थित राहणार आहे.  

मुंबई, पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, नांदेडसह राज्यातील हिंदी अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सदस्य, हिंदी अध्यापक या कार्यशाळेला उपस्थित राहणार असल्याची माहिती संघाचे कार्याध्यक्ष डॉ. सुंदर लोढे, पुणे विभाग अध्यक्ष डॉ. नेहा बोरसे तसेच पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. बबिता राजपूत यांनी दिली आहे.

👉 आर्थिक पत्रके जाहीर करणारी समता महाराष्ट्रातील एकमेव पतसंस्था : काका कोयटे 

👉 वृक्षांचे शहर म्हणून संगमनेरची ओळख : दुर्गाताई तांबे

👉 छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

 

Post a Comment

Previous Post Next Post