। अहमदनगर । दि.06 ऑगस्ट 2023 । मोबाईल टॉवरच्या बॅटर्या चोरुन नेणारा इसम टॉवर बॅटरीच्या एकुण 10 लाख 95 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह नगर तालुका पोलिसानी पकडला. ही कारवाई बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील विठ्ठलाचे नांदुर येथे केली.
या बाबतची हकीकत अशी की, प्रदिप दत्तात्रय गारुडकर ( रा.केडगाव, अ.नगर ) हे चिचोंडी पाटील शिवारातील सर्व जिओ कंपनीचे टॉवर चालू आहेत का हे पाहण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी एक टॉवर बंद असल्याचे आढळून आले.टॉवर कंपनीच्या केबीनचे कुलूप तुटलेले दिसले.
केबीनच्या आतमध्ये जावून पाहाणी केली असता त्यांना केबीनमध्ये असलेल्या कॉस लाईट कंपनीच्या एकुण 3 बॅटर्या दिसून आल्या नाहीत म्हणून त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत त्यानंतर ते कामरगाव हद्दीतील टॉवरची देखरेख करणारे अनिल कदम यांना फोन केला व य घटनेची हकीकत सांगितली
त्यावेळेस त्यांनी सांगितले की टॉवर क्र 1 एम एच ए एम डी जी इ एन बी 6027 या टॉवरच्या व्हीजन कंपनीच्या 5 बॅटर्या चोरीला गेलेल्या आहेत. त्यावेळेस त्यांची खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात चोरट्यानी टॉवरच्या बॅटर्या चोरुन नेल्या.याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोद करण्यात आली.
या घटनेचे गांर्भिय लक्षात घेवून व नगर तालुका पोलिसांचे पथकाने मोबाईल टॉवरकडे जाणार्या रोडवरील सिसिटीव्हीची पाहणी केली असता त्यामध्ये दोन इसम स्कुटीवर बॅटर्या घेवून जात असताना दिसून आले व तांत्रीक विशलेषनद्वारे तपास करुन गुन्हेगाराचे नाव निश्चित केले.
त्यानुसार या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना पोलिसाना मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी विनोद खिळदकर ( रा.विठ्ठलाचे नांदूर ता. आष्टी जिल्हा बीड ) हा त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले . त्यास चोरीच्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सांगितले की
सागर धर्मा गायकवाड ( रा. विठ्ठलाचे नांदूर ता. आष्टी जिल्हा बीड ) याच्यासह मिळून केली.असे सांगून अ.नगर व बीड जिल्ह्यातील एकूण 6 गुन्हे केलेले आहेत व त्यातील मुद्देमाल हा लक्ष्मी लॉज जवळ माळीवाडा, अ.नगर येथे एका गाळयामध्ये ठेवलेला आहे असे सांगितले.
त्यास सोबत घेवून लक्ष्मी लॉज शेजारी माळीवाडा येथील गाळयातून 44 छोटया मोठया बॉटर्या असा एकूण दहा लाख पच्यानऊ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलिस अंमलदार यांचे पथकाने केलेली आहे
