। मुंबई । दि.07 ऑगस्ट 2023 । आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 17 ऑगस्टपासून राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहेत.
कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या बीड मतदारसंघामधून शरद पवार आपल्या दौर्याला सुरुवात करणार आहेत. या दौर्यात शरद पवार बंडखोरी करणार्या अजित पवार आणि त्यांच्या गटातील आमदारांवर टीका करतील का, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्यानंतर शरद पवारांनी राज्यव्यापी दौरा करण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी पहिली सभा अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात घेतली होती.
त्यानंतर त्यांनी कोणताही दौरा केला नव्हता. पावसामुळे त्यांनी आपला दौरा थांबवला होता. पावसाचा अंदाज घेऊन लवकरच दौर्याची तारीख जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार आता ते 17 ऑगस्टपासून राज्यव्यापी दौरा करणार आहेत.
Tags:
Breaking
