मराठा आरक्षण प्रश्न सोडवा ; मुंबईत आंदोलनाचा इशारा


। छत्रपती संभाजीनगर । दि.24 जुलै 2023 । राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा या प्रमुख मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने रविवारी कायगाव टोका येथे रास्ता रोको आंदोलन केले. 9 ऑगस्ट क्रांती दिनापूर्वी निर्णय घ्यावा, अन्यथा मुंबईत आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी रमेश केरेपाटील यांनी दिला.

तसेच सरकारच्या वेळखाऊ धोरणाविरोधात आंदोलकांनी निदर्शने केली. 40 वर्षांपासून आरक्षणासाठी सकल मराठा समाज संघर्ष करत आहे. सर्वच पक्षांनी सत्ता उपभोगली. मात्र, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही. यामुळे मराठा समाजात तीव्र संतापाची लाट उसळलेली असल्याचे केरे म्हणाले आणि सरकारला 9 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिल्याचे सांगितले. या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा तरुण सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post