। अहमदनगर। दि.28 जुलै 2023 । भाजपा दिव्यांग सेलचे नगर जिल्हाध्यक्ष वसंत गोपीनाथ शिंदे यांची नुकतेच नगर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्यपदी दुसर्यांदा नियुक्ती झाली. वसंत शिंदे यांनी भाजपा दिव्यांग सेलच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या प्रश्नांसाठी नेहमीच आवाज उठविला. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आदि योजनांचा लाभ संबंधितांपर्यंत पोहचविण्यासाठी ते नेहमीच धडपड करत असत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची या पदावर दुसर्यांदा निवड झाली आहे.
विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवार आणि मंगळवारी सुट्टी
या नियुक्तीबद्दल पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा., खा.डॉ.सुजय विखे पा., माजी मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, युवा नेते पै.अक्षय कर्डिले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, आदिंसह भाजपा व दिव्यांग सेलचे पदाधिकारी व इतरांनी अभिनंदन केले आहे.
उमेश देवकर एलएलबी परिक्षेत द्वितीय
निवडीनंतर बोलतांना वसंत शिंदे म्हणाले, शासनाच्या योजनांचा लाभ संबंधितांपर्यंत पोहचविण्याचा आपला प्रयत्न राहिला आहे. आता मिळालेल्या पदाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना जास्तीत जास्त दिव्यांग व लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करु, असा मानस व्यक्त केला. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी समिती सदस्यांशी संपर्क साधावा व रु.1,500 रुपये पेन्शनचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी केले.