मोक्का, दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी ‘एलसीबी’कडून अखेर जेरबंद


। अहमदनगर । दि.10 जुलै 2023 ।  मोक्का व दरोड्याच्या गुन्ह्यात पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. मिथून बंड्या काळे (वय 30, रा. आखोणी, ता. कर्जत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

एक रूपयात पीक विमा लाभ देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य : महसूलमंत्री

मारुती कारमधून दत्तात्रय बंडु ननवरे (वय 48, रा. दौंड, जिल्हा पुणे) हे कुटुंबीयांसह जाताना मातोश्री हॉस्पीटल काष्टी ते दौंड जाणारे रोड, ता. श्रीगोंदा येथे लघुशंकेसाठी थांबलेले असताना पाच ते सहा इसमांनी चाकुचा धाक दाखवुन 3 लाख 48 हजार रुपयांच्या किंमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन, घड्याळ व मारुती कार दरोडा चोरी करुन चोरुन नेले होते. 

शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सदर घटनेबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे तपासात पाच आरोपी निष्पन्न करुन दोन आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले होते व इतर तीन आरोपी अद्याप पावेतो फरार होते. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि दिनेश आहेर यांना गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते.

जाधव मँडमच्या बदलीने विद्यार्थ्यांसह पालकही झाले भावूक....

नमुद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे  शाखेतील पोहेकॉ अतुल लोटके, पोना रविंद्र कर्डीले, विजय ठोंबरे, पोकॉ रोहित मिसाळ, आकाश काळे, बाळू खेडकर व भाऊसाहेब काळे यांना जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. 

मोसंबीच्या बागेमधून गांजा जप्त ; एक ताब्यात

कर्जत परिसरात फरार आरोपींचा शोध घेताना पोनि आहेर यांना नमुद गुन्ह्यातील फरार आरोपी मिथुन काळे (रा. आखोणी, ता. कर्जत) हा त्याच्या राहते घरी आला आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपी मिथुन बंड्या काळे हा सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुध्द अहमदनगर, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील गंभीर स्वरुपाचे दहा गुन्हे दाखल आहेत.

पंकजा मुंडे यांच्याकडून धनंजय मुंडे यांचे औक्षण 

Post a Comment

Previous Post Next Post